Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
31 verses
1अहरोनच्या मुलांची वर्गवारी अशी: नादाब, अबीहू एलजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.
2पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या वडीलांच्या आधीच वारले. शिवाय त्यांना मुलेही झाली नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
3प्रत्येकाला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडता यावीत म्हणून दावीदाने एलाजार आणि इथामार यांच्या वंशजांची स्वतंत्र गटांत विभागणी करुन टाकली. त्यासाठी दावीदाने सादोक आणि अहीमलेख यांची मदत घेतली. सादोक हा एलाजारच्या वंशातला आणि अहीमलेख इथामारच्या
4इथामारपेक्षा एलाजारच्या घराण्यात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजारच्या घराण्यात सोळा जण प्रमुख होते तर इथामारच्या घराण्यात आठ जण.
5दोन्ही घराण्यातील पुरुषांनी निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे मुखत्यार म्हणून नेमले तर काहींना याजक म्हणून सेवेसाठी नेमले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या घराण्यातलेच होते.
6शमाया लेखनिक होता. हा नथनेलचा मुलगा. याचे घराणे लेवीचे होते सर्व वंशजांची नावे लिहिण्याचे काम शमायाने केले. राजा दावीद आणि इतर प्रमुख मंडळी-उदाहरणार्थ सादोक हा याजक, अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख-यांच्यासमोर त्याने या नोंदी केल्या. अहीमलेख हा अब्याथारचा मुलगा. दावेळी चिठ्ठ्या टाकून त्यातून एकाची निवड करण्यात येई. आणि शमाया त्या माणसाचे नाव लिहून ठेवी. अशाप्रकारे एलाजार आणि इथामार यांच्या कुळातील लोकांमध्ये कामाची वाटणी करण्यात आली.
7यहोयारीबचा गट पहिला होता. दुसरा गट यदायाचा.
8हारीमचा गट तिसरा. सोरीमचा गट चौथा.
9मलकीयाचा पाचवा गट. सहावा गट मयामिनचा.
100हक्कोसाचा सातवा गट. आठवा गट अबीयाचा.
11नववा गट येशूवाचा . दहावा गट शकन्याचा.
12अकरावा गट एल्याशिबाचा. बारावा गट याकीमचा.
13तेरावा गट हुप्पाचा. चवदावा गट येशेबाबाचा.
14पंधरावा गट बिल्गाचा. सोळावा गट इम्मेराचा.
15सतरावा गट हेजीराचा. अठरावा गट हप्पिसेसाचा.
16पथह्याचा गट एकोणिसावा. विसावा गट यहेजकेलाचा.
17एकविसावा गट याखीनचा. बाविसावा गट गामूलचा.
18तेविसावा गट दलायाचा. आणि चोविसावा गट माज्याचा.
19परमेश्वराच्या मंदिरात ���ेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
20लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे:अम्रामच्या वंशातील मुलेबाळे: शूबाएल. शूबाएलचे वंशज: यहदाया.
21रहब्याचे वंशज: इशिया. (हा सर्वात थोरला.)
22इसहार घराण्यापैकी: शलोमोथ. शलोमोथच्या घराण्यातून: यहथ.
23हेब्रोनचा मोठा मुलगा यरीया. हेब्रोनचा दुसरा मुलगा अमऱ्या. यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम.
24उज्जियेलचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा शामीर.
25इश्शिया हा मीखाचा भाऊ. इश्शियाचा मुलगा जखऱ्या.
26मरारीचे वंशज: महली मूशी आणि याजीया.
27मरारीचा मुलगा याजीया याची मुले: शोहम व जक्कूर.
28एलजार हा महलीचा मुलगा. पण एलाजारला पुत्रसंतती नव्हती.
29कीशाचा मुलगा यरहमेल.
30महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे मुलगे.लेवी घराण्यातील हे प्रमुख होत. आपापल्या घराण्याप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली.
31खास कामगिरीकरता त्यांची निवड करण्यात आली. अहरोनचे वंशज असलेले त्यांचे याजक नातलग यांच्याप्रमाणेच चिठ्ठ्या टाकून ही निवड झाली. राजा दावीदा, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. कामाच्या नेमणुकीमध्ये घराण्यातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ बांधव असा भेदभाव नव्हता.