Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
17 verses
1म्हणून मी असा निश्चय केला की, मी पुन्हा तुमची दु:खदायक अशी भेठ घेणार नाही.
2कारण जर मी तुम्हांला दु:ख देतो तर मला तुमच्याशिवाय आनंद कोण देईल?
3आणि मी तुम्हांस हे यासाठी लिहिले की, मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.
4कारण मी अत्यंत दु:खाने व कळवळून हे लिहित आहे पण तुम्हांला खिन्न करावे म्हणून नव्हे तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीति आहे तिची खोली तुम्हांला समजावी म्हणून लिहित आहे.
5जर कोणी कोणाला दु:ख दिले असेल तर त्याने फक्त मलाच ते दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही.
6अशा मनुष्यांना सगळ्यांनी मिळून दिलेली शिक्षा पुरे.
7आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे आणि त्याचे सांत्वन केले पाहिजे. यासाठी की अति दु:खाने तो दबून जाऊ नये.
8मी विनंति करतो, म्हणून तुमचे त्याच्यावरील प्रेम पुन्हा व्यक्त करा.
9मी तुम्हांला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्हा आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे.
10जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मीसुद्धा त्याला क्षमा करीन. आणि ज्याची ज्या कशाची मी क्षमा केली आहे, आणि त्यातूनही जर काही क्षमा करण्याचे राहिले असेल - तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुमची क्षमा केली आहे.
11यासाठी की सैतानाने आम्हांवर वरचढ होऊ नये. कारण त्याच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाही.
12जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर,
13माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे सामाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो.
14पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो.
15कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत.
16हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे?
17इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही. याउलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो.