Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
14 verses
1भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला.
2पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले.
3पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला.
4तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
5त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,“तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.”स्तोत्र.2:7देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,“मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल.”2शमुवेल 7:14
6आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो,“देवाचे सर्व देवदूत त्याची उपासना करोत.”अनुवाद 32:43
7देवदूताविषयी देव असे म्हणतो,“तो त्याच्या देवदूतांना वारा बनवितो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवितो.”स्तोत्र. 104:4
8पण पुत्राविषयी तो असे म्हणतो,“तुझे सिंहासन, हे देवा, तुझे सिंहासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य न्यायाचे असेल.
9नीति तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस. म्हणून देवाने तुझ्या देवाने, तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंदादायी तेलाचा अभिषेक केला आहे.”स्तोत्र. 45:6-7
10आणि देव असेही म्हणाला, “हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
11ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
12तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.”स्तोत्र. 102:25-27
13तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही,“तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”स्तोत्र. 110:1
14सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठविले जातात की नाही?