Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
20 verses
1मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती गोळा केलेल्या फळासारखी आणि अगोदरच द्राक्षे तोडल्यामुळे खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत तशी झाली आहे. खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत. मला आवडणारी पहिल्या बहराची अंजिरे अजिबात नाहीत.
2ह्याचाच अर्थ, सर्व प्रामाणिक लोक गेलेत. ह्या देशात चांगले लोक उरले नाहीत. प्रत्येकजण कोणाला तरी ठार मारण्यासाठी टपला आहे. प्रत्येकजण आपल्या भावाला सापळ्यात अडकविण्याच्या प्रयत्नात आहे.
3लोक दोन्ही दोन्ही हातांनी दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी लाच मागतात. न्यायालयातील निकाल बदलण्यासाठी न्यायाधीश पैसे घेतात. “मोठे नेते” चांगले आणि न्याय निर्णय घेत नाहीत. ते मनात येईल ते करतात.
4त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. ते गुंत्तागुंत असलेल्या कोटेरी झुडुपापेक्षा वाकडा (कपटी) आहे.हा दिवस येईल असे तुमच्या संदेष्ट्यांनी सांगितले होते. तो तुमच्या पहारेकऱ्यांनी सांगितलेला दिवस आला आहे. आता तुम्हाला शिक्षा होईल. तुमचा गोधंळ उडेल.
5तुमच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मित्रावरही विश्वासून राहू नका. तुमच्या पत्नीशीसुध्दा मनमोकळे बोलू नका.
6स्वत:च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल.
7म्हणून मी मदतीसाठी परमेश्वराकडे पाहतो. परमेश्वराने माझे रक्षण करावे म्हणून मी वाट पाहतो. माझा परमेश्वर माझे ऐकेल.
8मी पडलो आहे. पण शत्रूंनो, मला हसू नका. मी पुन्हा उठेन आता मी अंधारात बसतोय पण परमेश्वरच माझा प्रकाश होईल.
9मी परमेश्वराविरुध्द पाप केले. म्हणून तो माझ्यावर रागावला. पण न्यायालयात तो माझ्यासाठी माझ्या दाव्यात वाद घालेल. माझ्यासाठी योग्य गोष्टी तो करील. मग तो मला बाहेर उजेडात आणील. मग मला त्याचे बरोबर आहे हे कळेल.
10माझा शत्रू मला म्हणाला: “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” पण माझा शत्रू ही पाहील आणि तो लज्जित होईल. त्यावेळी मी तिला हसेन.रस्त्यातील चिखलावरुन चालावे. तसे लोक त्याला तुडवीत चालतील.
11तुमचे तट परत बांधण्याची वेळ येईल. त्या वेळेला, देशाचा विस्तार होईल.
12तुमचे लोक तुमच्या देशात परत येतील. ते अश्शूर आणि मिसरमधील गावे येथून परततील. ते मिसरमधून व फरात नदीच्या पैलतीरावरुन येतील. पश्चिमेकडच्या समुद्राकडून आणि पूर्वेच्या पर्वतांतून ते येतील.
13देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांमुळे देशाचा नाश झाला आहे.
14म्हणून तुझ्या दंडाने लोकांवर राज्य कर. तुझ्या मालकीच्या लोकांच्या समुदायावर राज्य कर. तो लोकांचा समुदाय एकटाच रानात आणि कर्मेल पर्वतावर राहतो. पूर्वीप्रमाणेच तो बाशान व गिलाद यांच���यामध्ये रातो.
15तुम्हाला मिसरमधून बाहेर आणताना मी खूप चमत्कार केले. त्यांच्यासारखे आणखी चमत्कार मी तुम्हाला दाखवीन.
16राष्ट्रे ते चमत्कार पाहून लज्जित होतील. माझ्या तुलनेत त्यांची “शक्ती” काहीच नाही, हे त्यांना दिसेल. ते विस्मयचकित होतील आणि आश्चर्याने तोंडावर हात ठेवतील. कान झाकून घेऊन ते ऐकण्याचे नाकारतील.
17ते सापाप्रमाणे मातीत सरपटतील. भीतीने थरथर कापतील. जमिनीत राहणाऱ्या किड्यांप्रमाणे आपल्या बिळातून प्रभूकडे, आपल्या परमेश्वराकडे, यायला लागतील. हे परमेश्वरा, ते तुला घाबरतील आणि मान देतील.
18परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. पापी लोकांनाही तू क्षमा करतोस. तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस. परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही. का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
19तो परत येईल व आमचे सांत्वन करील. तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.
20हे देवा, याकोबशी प्रामाणिक राहा. अब्रहामबद्दल तुला असलेले खरे प्रेम दाखव. फार पूर्वी तू आमच्या पूर्वजांना दिलेले वचन पाळ.