Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
29 verses
1परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
2“इस्राएल लोकांना ही आज्ञा दे: तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या.
3दक्षिणे कडे अदोमजवळच्या त्सीन वाळवंटाचा काही भाग तुम्हाला मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल.
4तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करुन ती त्सीन वाळवंटातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल.
5असमोनहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि भूमध्यसमुद्रात तिची समाप्ती होईल.
6तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे भूमध्यसमुद्र (महासमुद्र).
7तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये).
8होर पर्वतावरुन ती लेबो-हमासला जाईल व तेथून सदादला.
9नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा.
10तुमची पूर्व सीमा एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.
11शफामपासून ती अईनच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा गालीली तलावाजवळच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल.
12आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.”
13तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना या आज्ञा दिल्या, “तुम्हाला हा प्रदेश मिळेल. तुम्ही नऊ कुळात आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळात जमिनीची विभागणी करण्यासाठी चिठ्ठ्या टाकाल.
14रऊबेन आणि गादची कुळे आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांनी आधीच त्यांची जमीन घेतली आहे.
15त्या अडीच कुळानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडची जागा घेतली आहे.”
16नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
17“जमिनीची विभागणी करण्यासाठी तुला या माणसांची मदत होईल: याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.
18आणि सर्व कुळांचे प्रमुख. प्रत्येक कुळाचा एक प्रमुख असेल. ते लोक जमिनीची विभागणी करतील.
19प्रमुखांची ही नावे आहेत:यहुदाच्या वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
20शिमोनेच्या कुटुंबातील अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल.
21बन्यामिनच्या कुटुंबातील किसलोनच्या मुलगा अलीदाद.
22दानी कुटुंबातील यागलीचा मुलगा बुक्की.
23योसेफच्या वंशातील मनश्शेच्या कुटुंबातील एफोदचा मुलगा हन्नीएल.
24एफ्राईम कुटुंबातील शिफटानचा मुलगा कमुवेल.
25जबुलून वंशातील पर्नाकचा मुलगा अलीसाफान.
26इस्साखार वंशातील अज्जानचा मुलगा पलटीयेल.
27आशेरी वंशातील शलोमीचा मुलगा अहीहूद.
28आणि नप्ताली वंशातील अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.”
29परमेश्वराने कनानच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या माणसांची निवड केली.