Loading Bible Translation
First-time download in progress. This may take a few seconds…
Marathi Holy Bible Wordproject Bible
9 verses
1“आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या,” असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
2आपण इथे आहोत. यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
3हे नवीन यरुशलेम आहे. हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
4कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा. इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात. ही कुटुंबे देवाची आहेत.
5राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली. दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.
6यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा. “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल,
7अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो.”
8तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो”. माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
9आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.